"महिला...."
वर्षातून एकदा येणारा महिला दिन, अनेक जण एक उत्साहाने साजरा करतात. या दिवशी भली मोठी रॅली काढणे, भाषणाचे कार्यक्रम ठेवणे, महिलांचा सत्कार करणे इ. अनेक कार्यक्रम होताना दिसतात पण, हे कार्यक्रम करतात कोण? ??? महिलाच! पुरूषमंडळी इतकी दिसत नाही...असो.
'म'+ नाने खुप मोठी,
'हि' + मंतीने उभी राहणारी,
'ला' + जरी आणि लाजवणारी ही,
जगातील प्रत्येक पुरूषांच्या मागे ही महिलाच असते, मग कोणकोणत्या नात्याने असो, पत्नी, आई, बहिण, मैत्रीण इ. अनेक रुपाने ती उभी असते, पुरूष मानो अगर न मानो. अलिकडे लोक खुल्या मनाने महिलांविषयी मत मांडू लागलेत, चांगले आहे. आपल्या मागे उभे आसणारी स्त्री आता अनेकांच्या विचारातून पुढे येत आहे. तस म्हंटलं तर अलीकडे स्त्रीयांना मत मांडण्याचा अधिकार आणि मनमोकळेपणाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे,मिळालाच पाहिजे. शिक्षीत पुरूषांना आता समजत आहे, स्त्री ही बांधून ठेवण्यासाठी नाही, तुला उडाण भरु द्या, अलीकडे तसे होताना दिसत आहे.
गंभीर गोष्ट आहे पण, खरी आहे स्त्री च स्त्री चे पाय ओढताना दिसते आहे, त्यांचेच एकमेकींशी जणू युद्धविरोधी जुपल्यासारखे. असो.
माझे मत एवढेच आहे, प्रत्येक दिवस महिलांचा सन्मान करा, एखांद्या दिवसाचीच वाट पाहू नका, स्त्री या विषयावर मनमोकळेपणाने बोलायला शिका, विषेत: स्त्रीयांनी स्त्रीयांचा मान सन्मान करा, एकमेकींना समजावून घ्या, एकमेकींचा आधार व्हा, एकमेकींना पुढे आणन्यासाठी पुढे या, जग तुमच्यामुळेच चालले आहे हे लक्षात घ्या, बाकी तुम्ही खूप विचारशील आहात.
महिला दिनाच्या खूप सार्या शुभेच्छा!
रवी वराळे,
८८०६९०२०२०
Comments
Post a Comment