"निकालाचा कागद तुमची व्हॅल्यू नाही..."

दरवर्षी शाळेचे निकालपत्र जाहीर होते, दरवर्षी प्रमाणे कोण १००% तर कोण ३५ % गुण मिळवतात. तसेच याही वर्षी काल दि. २९ जुलै २०२० ला दुपारी online निकाल जाहीर झाला. उत्सुकतेने वाट पाहणारी मुले-मुली आणि त्यांच्यापेक्षा ही जास्त उत्सुकता असणारे पालक सकाळ पासूनच online होते. जरी निकाल हा दुपारी १ वाजता जाहीर होणार असे सांगितले असले तरी सकाळपासूनच पाल्याच्या आणि काॅम्प्युटरच्या हात धुवून मागे लागतात, आणि निकाल हाती लागतो.
           माझ्या मुलाला किती टक्के पडलेत याचबरोबर शेजारील, त्याच्या मित्राला कीती टक्के पडलेत हे पहायला उत्सुकता असते. माझ्याला ४०%,४५%,४७ % ते  ५४% 😳 ... शेजारी मुलाला ६०% किंवा ९२% , ९४% असे असतील तर माझ्याला कमी पडलेत याचे दुख नसते तर शेजारील मुलाला माझ्या मुलापेक्षा जास्त कसे? यानेच मग मुलाला मारायचे, शिव्या द्यायच्या इ. बरेच उद्योग करायचे. (जणे करुन स्वतः आपल्या काळात उजेड पाडलेला होता असे. ) माझ्या सांभाळण्यामध्ये काय कमी पडले? तुझ्या लाडाने झालाय तो असा??? अभ्यास नको, बोंबलत फिरायला पाहीजे...असे मुलाला सुनवायचे जणे करुन त्याने खुप मोठा अपराध करुन आलाय. मला असे म्हणायचे नाही कि, पालक चुकीचे बोलतात, चुकीचे वागतात, मुलांना रागवायला हवेच पण मुळात चूक कोणाची? आपली की पाल्याची? एकदा अंर्तमुख व्हायला हवे.
           तुम्ही किती वेळ आपल्या मुलासोबत घालवता, त्याला कसे समजावून घेता, त्याला काय करायला आवडते ज्यात त्याला करिअर करण्यासाठी लागणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी कशा पद्धतीने विश्लेषीत करता आणि सगळ्यात महत्वाचे तुम्ही स्वतः त्याच्यासमोर काय म्हणून आदर्श आहात हे पहिले शोधा. मग तुम्हाला त्याला काही सांगायची गरज पडणार नाही. त्याच्या गुणपत्रकाची एकूण टोटल पाहण्यापेक्षा सर्वात जास्त आणि चांगले गुण कोणत्या विषयामध्ये आहे हे शोधा, कोणता विषय अवघड जातोय ते पहा, तुम्हाला आवडणारा विषय कोणता? यावर त्याच्या आवडिचा काय संबंध नाही. त्याच्याशी गप्पा-टप्पा करा, त्याच्या डोक्यातील ओठावर येऊदे तर आणि तरच तुम्हाला त्याच्या बद्दलचे सर्व समजेल. ३-४ वेळा नापास झालेल्यांनीही जगासमोर आदर्श उभे केले आहेत. त्यामुळे तुमच्या पाल्याची गुण पत्रिका तुमच्या पाल्याची व्हॅल्यू नाही ठरवू शकत.
            विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी ही, पालक नेहमी चूक नसतात, त्यांना कमविण्याच्या- जमविण्याच्या नादात तुमच्याकडे लक्ष देता येत नाही, तुम्हाला वेळ देता येत नाही, तसेच तुम्हाला थोडी मोकळीक दिलेली असते याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कसेही वागावे, तुम्ही पुढाकार घ्या आई- बाबांशी बोला, मला हे आवडते, मला यामध्ये जायचे आहे, अन् त्यासाठी मी ही तयारी केली आहे, त्यासाठी तुमचा झजबा, तुमचा उत्साह, तुमची तळमळ, तुमची करण्याची तयारी, जिद्द दाखवा, पटवून द्या। आजकालचे पालक, तुमचे आई-बाबा थोडे मनाने मोकळे आहेत, समजावून घेणारे आहेत, तुम्हाला घडवण्यासाठी ते अजून राबायला तयार आहे फक्त गरज आहे ती त्यांचा सन्मान करण्याची, त्यांचा मान- सन्मान  वाढविण्याची,  त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची. त्यांची पण काय ईच्छा असते ओ, मुलगा माझा मोठा झाला पाहिजे, आमचे नाव मोठे केले पाहिजे, आमच्या कष्टाची चिज झाली पाहिजे, तुमच्या सुखासाठी ते धडपडत आहेत. त्यांना तुम्ही पण समजावून ध्या.
           आणि राहीला विषय गुणपत्रकाचा, तुमच्या टक्केवारीचा.। तुम्हाला थोडक्यात सांगू, "तुम्ही जेवढे कष्ट केलेत तेवढेच फळ तुम्हाला मिळते-मिळेल." त्यामुळे मी खूप अभ्यास केलेला अन् मार्क कमी मिळाले असा आव आणू नका, जेवढा वेळ तुम्ही मनापासून त्याला दिला तेवढेच मोल तुम्हाला. त्यामुळे लक्षात ठेवा कष्ट प्रामाणिकपणे आणि निरागसपणे करा इतेच्छ फल मिळतेच. आणि तुमचे मार्कलिष्ट तुमची व्हॅल्यू नाही ठरवू शकत. 
         जे आहे त्यात समाधान न मानता ( चांगल्या अर्थाने) अजून मिळविण्यासाठी प्रयत्न करा, प्रत्यक्षात कृती करा. तुम्हाला मिळणारे यश तुमच्यापासून कोणी हिरावून घेवू शकत नाही, तुम्ही ही नाही.
 अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
                               श्री. रविंद्र म. वराळे.

Comments

Post a Comment