Posts

Showing posts from March, 2021

"महिला...."

Image
          वर्षातून एकदा येणारा महिला दिन, अनेक जण एक उत्साहाने साजरा करतात. या दिवशी भली मोठी रॅली काढणे, भाषणाचे कार्यक्रम ठेवणे, महिलांचा सत्कार करणे इ. अनेक कार्यक्रम होताना दिसतात पण, हे कार्यक्रम करतात कोण? ??? महिलाच! पुरूषमंडळी इतकी दिसत नाही...असो.             'म'+ नाने खुप मोठी,            'हि' + मंतीने उभी राहणारी,            'ला' + जरी आणि लाजवणारी ही, जगातील प्रत्येक पुरूषांच्या मागे ही महिलाच असते, मग कोणकोणत्या नात्याने असो, पत्नी, आई, बहिण, मैत्रीण इ. अनेक रुपाने ती उभी असते, पुरूष मानो अगर न मानो. अलिकडे लोक खुल्या मनाने महिलांविषयी मत मांडू लागलेत, चांगले आहे. आपल्या मागे उभे आसणारी स्त्री आता अनेकांच्या विचारातून पुढे येत आहे. तस म्हंटलं तर अलीकडे स्त्रीयांना मत मांडण्याचा अधिकार आणि मनमोकळेपणाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे,मिळालाच पाहिजे. शिक्षीत पुरूषांना आता समजत आहे, स्त्री ही बांधून ठेवण्यासाठी नाही, तुला उडाण भरु द्या, अलीकडे तसे होता...