Posts

Showing posts from July, 2020

"निकालाचा कागद तुमची व्हॅल्यू नाही..."

Image
दरवर्षी शाळेचे निकालपत्र जाहीर होते, दरवर्षी प्रमाणे कोण १००% तर कोण ३५ % गुण मिळवतात. तसेच याही वर्षी काल दि. २९ जुलै २०२० ला दुपारी online निकाल जाहीर झाला. उत्सुकतेने वाट पाहणारी मुले-मुली आणि त्यांच्यापेक्षा ही जास्त उत्सुकता असणारे पालक सकाळ पासूनच online होते. जरी निकाल हा दुपारी १ वाजता जाहीर होणार असे सांगितले असले तरी सकाळपासूनच पाल्याच्या आणि काॅम्प्युटरच्या हात धुवून मागे लागतात, आणि निकाल हाती लागतो.            माझ्या मुलाला किती टक्के पडलेत याचबरोबर शेजारील, त्याच्या मित्राला कीती टक्के पडलेत हे पहायला उत्सुकता असते. माझ्याला ४०%,४५%,४७ % ते  ५४% 😳 ... शेजारी मुलाला ६०% किंवा ९२% , ९४% असे असतील तर माझ्याला कमी पडलेत याचे दुख नसते तर शेजारील मुलाला माझ्या मुलापेक्षा जास्त कसे? यानेच मग मुलाला मारायचे, शिव्या द्यायच्या इ. बरेच उद्योग करायचे. (जणे करुन स्वतः आपल्या काळात उजेड पाडलेला होता असे. ) माझ्या सांभाळण्यामध्ये काय कमी पडले? तुझ्या लाडाने झालाय तो असा??? अभ्यास नको, बोंबलत फिरायला पाहीजे...असे मुलाला सुनवायचे जणे करुन त्याने खुप मोठा...